गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाचा पदभार दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता दिलीप वळसे पाटील यांचे जुने सहकारी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जुना फोटो शेअर करून जुन्या आठवणी जाग्या केल्या आहेत.
दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन केले जात आहे. जयंत पाटील यांनीसुद्धा आपला जुना काळ आठवत वळसे पाटील यांचे अनोख्या पद्धतीने अभिनंदन केले आहे. त्यांनी वळसे पाटील यांना कडक शिस्तीचा प्रशासक म्हटलं आहे. तसेच इस्लामपूर येथील काँग्रेसच्या सभेतील एक जुना फोटो शेअर केला आहे.
“माझे जुने मित्र दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त, कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आता गृहमंत्रिपदाच्या जबाबदारीसाठीही मनापासून शुभेच्छा,” असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
माझे जुने मित्र ना. दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त, कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आता या नवीन जबाबदारीसाठीही त्यांना मनापासून शुभेच्छा!@Dwalsepatil pic.twitter.com/wd65NfhCIb
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 6, 2021