मुंबई | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीत मुंबई महानगरपालिका सुसज्ज झाली आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्याने, पूर्व उपनगरातील माहुल परिसरात भारत पेट्रोलियम कंपनी आणि मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट चे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फन्सच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच महालक्ष्मी येथील ऑक्सिजन प्लांटचे देखील लोकार्पण करण्यात आले.
आजमितीला मुंबईत कार्यान्वित होणारे हे दोन ऑक्सिजन प्लांट म्हणजे कोणत्याही संकटाविरोधात लढण्याच्या मुंबई स्पिरीट चं अनोखं उदाहरण आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका सज्ज आहे, मात्र नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोना विरोधातील लढाईत सक्रिय सहभाग द्यायला हवा.” अशा शब्दांत या लोकार्पण सोहळ्यात पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या आधीच राज्य सरकारच्या वतीने ‘ मिशन ऑक्सिजन ‘ ची घोषणा करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील मोठ्या कंपन्यांना ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत भारत पेट्रोलियम कंपनीने मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने या जंबो ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली असून या प्लांट मधून दिवसाला सुमारे दीड हजार ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती केली जाणार आहे.
हे ही वाचा