कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे समोर आले आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासंबंधीचे नियम धाब्यावर बसवून नागरिक बेजबाबदार पणे बाहेर फिरत असल्याने कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता कडक निर्बंध लागू केले आहेत.कल्याण डोंबिवली परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत उघडी राहणार आहेत.
सर्वाधिक कोरोना बाधित 392 रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचे 2360 रुग्ण उपचार घेत आहे. गेल्या 24 तासात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
आज कल्याण-डोंबिवली भागात कोरोना रुग्णांचा पुन्हा वाढता आलेख पाहायला मिळाला. त्यामुळे आयुक्तांनी तातडीची बैठक बोलावून कोरोना नियंत्रणावर तोडगा म्हणून लॉकडॉऊन लावण्यात येणार नसले तरीही कडक निर्बंध जारी करण्यात आले आहे.
काय होते बैठकीतील निर्णय
लग्न व इतर समारंभ सोशल डिस्टन्स चे पालन करत मोजक्या व्यक्तींमध्येच साजरे करण्यात यावे.
बार आणि रेस्टॉरंट यांना रात्री 9 वाजेपर्यंत चालू राहण्यास परवानगी असून रात्री 10 पर्यंत होम डिलिव्हरी साठी मान्यता देण्यात आली आहे.
महाशिवरात्री निमित्ताने गर्दी न होण्याची खबरदारी घेत प्रशासनाकडून परिसरातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात येणार आहेत.