राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे आणि भाजपा नेते यांच्यातील वाद पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. एका फोन कॉलची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून या ऑडिओ क्लिप्समध्ये एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राजकिय वर्तुळात ही व्ह्यायरल ऑडिओ क्लिप चर्चांना उधाण आणत आहे.
संबंधित ऑडिओ क्लिप मधिल संभाषण हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील शाळकरी विद्यार्थी आणि एकनाथ खडसे यांच्यातील असून जामनेर भागात पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याची तक्रार या विद्यार्थ्यांनी केली.
यावर प्रतिक्रिया देत गिरीश मेला का ? असे एकनाथ खडसे संभाषणात म्हणाले.इतकेच नाही तर गिरीश महाजन यांनी फक्त बायकांशीच बोलायचे असते, त्याला फक्त मुलींशीच बोलायचं असतं असे आक्षेपार्ह वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे.
दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लिपची पडताळणी केली असता हे संभाषण खरे आहे आणि आवाज माझाच असल्याचे एकनाथ खडसे यांनी कबूल केले आहे.
यावर प्रतिक्रिया देत गिरीष महाजन यांनी एकनाथ खडसेंवर चांगलाच पलटवार केला आहे. ते म्हणतात एकनाथ खडसे यांच्या बोलण्याचे मला वाईट वाटत नाही. त्यांना वयानुसार अनेक मानसिक आजारांनी घेरलं आहे,त्यामुळे एका शाळकरी विद्यार्थ्याशी कोणत्या भाषेत बोलावं याचं ताळतंत्र त्यांना राहिलेले नाही.
मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्नं स्वप्नचं राहिलं, शिवाय राष्ट्रवादी मध्ये गेल्यानंतर त्यांना कोणीच विचारात नसल्याने त्यांच्यावर मानसिक आघात झाल्याने ते काही बाही बडबडत असतात असे भाजपा नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर पलटवार केला आहे.