पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोरोना योध्या बरोबर यंदाचा रक्षाबंधन चा कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी या संकटाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून कुटुंबापासून दूर राहून काम करणाऱ्या सफाई कामगार , रुग्णवाहिका चालक , पोलीस , परिचारक यांचा राखी बांधून सन्मान करण्यात आला .
दरम्यान, खा. सुप्रिया सुळे बोलताना म्हणल्या की, गेल्या दीड वर्षापासून कारोना योद्धे ,आपण घरात असताना ते मैदानाबाहेर स्वतःच जीव धोक्यात घालून कुटुंबापासून दूर राहून काम करत आहेत. सातत्याने ते काम करत होते. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता. माणुसकी आता आता संपली आहे असे असतानाच ; या संकटाच्या काळात आपल्याला माणुसकी पाहायला मिळाली.
कोरोनाने माणुसकी सोबत नात्याचेही दर्शन दाखवलं , अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी पोलिसांनी केलेल्या कामाचा व्हिडिओ चा दाखला देत; त्यांच्या मीडिया अकाऊंटला फॉलो करण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाला खा. सुप्रिया सुळे, महिला प्रदेशध्यक्ष रुपाली ताई चाकणकर , पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.