बुलडाणा- राज्यात प्रतिबंधित असलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा खामगाव शहर पोलिसांनी वाहतूक करतांना पकडला आहे.या प्रकरणी खामगावातील दोघांना ताब्यात घेतले आहे..
खामगाव शहर पोलिसांनी निर्मल टर्निंग येथे नाकाबंदी केली असता सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास सदर ऑटो टिळक पुतळ्याकडून पोलिसांना येताना दिसला. यावेळी पोलिसांनी त्या ऑटोला थांबवले असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला सुगंधी केसर युक्त विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू असा १ लाख८७ हजार रुपयांचा मुद्देमाल व ऑटो मोबाईल व इतर साहित्य असा एकूण २ लाख ८५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करत असतांना पोलिसांनी यामध्ये मोहम्मद अब्रार मोहम्मद सबदर वय ३२ राहणार बर्डे प्लॉट खामगाव ,मोहम्मद अख्तर शेख अयुब व ५१ राहणार जुना फैल खामगाव अशा दोघांना ताब्यात घेतले आहे.