एकीकडे भारतात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तर दुसरीकडे बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खानच्या कुटुंबाला रातोरात न्यूयॉर्कला जाताना मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले. बुधवारी रात्री अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि पत्नी गौरी खान यांना बुधवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले. यावेळी हे दोघेही न्यूयॉर्कला रवाना होण्यासाठी विमानतळावर गेले होते. या दोघांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही लोक त्यांना कोरोनाची आठवण करून देत आहेत. तर काही लोक या कठीण काळात देश सोडून चालल्याबद्दल त्यांच्यावर टीका करत आहेत.
सतत कोणत्या ना कोणत्या विषयावरून नेटकरी सेलिब्रिटींना ट्रोल करत असतात. मात्र शाहरुख खानचं संपूर्ण कुटुंब ट्रोल झालं आहे. किंग खानची मुलगी न्यूयॉर्कमध्ये एकटीच राहत आहे. कोरोना काळात, भाऊ आर्यन खान आणि आई गौरी खान हे तिला भेटण्यासाठी निघाले आहेत. अशा स्थितीत लोकांचा रोष या दोघांवर उमटला आहे.
नेटकऱ्यांचा चढला पारा
एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, ‘हे सेलिब्रेटी फक्त नावाचे भारतीय आहेत, जेव्हा जेव्हा देशावर एखादी समस्या येते तेव्हा ते देशापासून दूर पळून जातात.’ त्याच वेळी, दुसर्या वापरकर्त्याने लिहिले, ‘हो, जर भारताची परिस्थिती बिकट झाली, हे तर सर्व परदेशात पळून जातात, इथे पैसे मिळवा पण इथल्या लोकांना गरज पडल्यास बाहेर निघून जा.’
तर दुसऱ्याने ‘लॉकडाऊन फक्त सामान्य लोकांसाठी आहे का?, ही माणसे कशी जगभर फिरत आहेत’. त्याचवेळी एका व्यक्तीने लिहिले की, ‘कोणीतरी मालदीवला जात आहे, कोणी न्यूयॉर्कला जात आहे’. त्याचवेळी एकाने लिहिले, ‘त्यांना भारताबाहेरच काढा.’ असे अनेक प्रश्न उपस्थित करून त्यांना ट्रोल करण्यात आले आहे.