देशात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. यात कोरोना संसर्ग संदर्भात आता महाराष्ट्राचा पाहीला क्रमांक लागला आहे. तसेच राज्यातील रुग्णालयांची स्थिती अतिशय बिकट होत चालली आहे.
त्या पाठोपाठ आता रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होत असतानाच रुग्णालयांमध्ये बेडची मोठी कमतरता जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत अनेक रुग्णांना खुर्चीवरच ऑक्सिजन दिला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात रविवारी कोरोनाचे आतापर्यंतचे सर्वाधिक अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
धाराशिवमध्ये भयंकर चित्र पाहायला मिळत आहे. धाराशिव सरकारी रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेड शिल्लक असतानादेखील खुर्चीवर बसवून ऑक्सिजन दिला जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या प्रकारामुळे वृद्ध रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे.