नाशिक – मुंबईसह अनेक महाराष्ट्रातील जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात नाशिकमध्येही कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरांमध्ये रेमडीसीवर इंजेक्शनची प्रचंड टंचाई जाणवत आहे त्यामुळे नागरिकांनी संतप्त होऊन नाशिक शहरातील महात्मा गांधी रोडवर ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा प्रशासनाने रुग्णालयात इंजेक्शन पुरवण्याचे नियोजन केले असले तरी प्रत्यक्षात डॉक्टर रुग्णांना इंजेक्शन आणण्यासाठी पाठवत आहेत त्यामुळे निवडक मेडिकल दुकानांसमोर सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत रांगा लागत आहेत अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेले हेल्पलाईन नंबरही कोणी उचलत नाही त्यामुळे नागरिक प्रचंड संतप्त होईन आंदोलन करत आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ आज नाशिक मध्ये असून त्यांनी तरी यात लक्ष घालून तोडगा काढावा अशी मागणी होत आहे. मात्र आता यावर पालकमंत्री छगन भुजबळ काय पर्याय काढणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. नाहीतर हे प्रकरण अजून संतप्त होण्याची शक्यता आहे.