आनंदी असू देत आपली दिनचर्या !


आनंदी असू देत आपली दिनचर्या !

शब्द, डोळे, स्पर्श यांची किमया…
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
शब्द, डोळे व स्पर्श तीन्ही चांगल्या रीतीने मनातील अमूल्य भावना व्यक्त करु शकतात. ज्या भावना, विचार, मत शब्दात सांगणे कठीण जाते ते डोळे मात्र एका कटाक्षात, सहज सविस्तर सांगून जातात, आणि जे डोळ्यांनाही सांगणे कठीण असते ते स्पर्श अलगद सांगून जातो. प्रेम, माया, ममता, करुणा, आनंद, सुख जे एखाद्याबद्दल आपणास वाटते ते नजर, डोळे कधीच लपवू शकत नाहीत.
मात्र स्पर्श हा डोळे व शब्दांपेक्षा चांगल्या रीतीने दिलासा, आनंद देऊ शकतो. डोक्यावर, पाठीवर अलगद स्पर्श होऊन हात विसावला की कधी त्यातून शाबासकी मिळते, कधी त्यातून प्रेरणा मिळून जाते, कधी धैर्य देण्याचे काम हेच हात करतात, कधी हेच हात कर्तव्य जबाबदारीची जाणीव जागृत करतात, तर कधी याच सुज्ञ हातात एखादे दु:ख हलके करण्याचे प्रचंड सामर्थ्य असते. “शब्द” ज्यांना अलगद गुंफता आले, तर ते “डोळे” नकळत ओलावून हृदयाला “स्पर्श” करुन आनंद देऊ शकतात, अनुभवले आहे का.🙏🏻

✍️ के डी सर ग्रंथपाल, बलसूर-धाराशिव


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *