लंडन दि.२०- करोना विषाणूचा संसर्ग संपूर्ण जगात झपाट्याने वाढत चालला आहे. अशातच फ्रान्समध्ये नव्या शुक्रवारी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. हा लॉकडाउन महिनाभराचे असल्याचे घोषित करण्यात आले. पॅरिससह देशातील अन्य १५ शहरातही शुक्रवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउन लागू केला गेला. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्सच्या यांनी नव्या लॉकडाउनचे नियम हे पूर्वीइतके कडक नसतील, असे स्पष्ट केले आहे. फ्रान्समध्ये गेल्या चोवीस तासात ३५ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहे.
आवश्यक साधनांसह काही व्यवसाय आणि सेवा सुरु ठेवण्यास परवानगी दिली जात आहे. बालवाडी, शाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत. यादरम्यान नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडू शकतात, तसेच मैदानावर खेळूही शकतात. मात्र त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र बाळगावे लागणार आहे. घराच्या दहा किलोमीटर परिसरातच फिरण्याची मुभा असेल.