राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन विषयी भाष्य केले आहे. जर रुग्णसंख्या रोखायची असेल तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही तसेच इतर देशांनी सुद्धा हाच परिरय निवडला आहे असे सुद्धा सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बोलून दाखविले होते.
यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आघाडी सरकारला काही सूचनाही केल्या. राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याने सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. लोकांचे जीव वाचवण्याला प्राथमिकता दिली पाहिजे तसेच पुढे बोलताना लॉकडाऊनचा निर्णय मोदी सरकारसारखा नियोजन शून्य कारभारासारखा नसावा असे पटोले यांनी बोलून दाखवीले होते.
पुढे बोलताना पटोले म्हणाले की, मोदींच्या नियोजनशून्य लॉकडाऊनच्या निर्णयाने लाखो लोकांचे रोजगार गेले, लोकांचे प्रचंड हाल झाले तसे होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारला सहकार्य करावे असे आवाहनही पटोले यांनी केले आहे.