ज्येष्ठ विचारवंत, अभिनेते आणि लेखक म्हणून प्रसिद्ध असणारे वीरा साथीदार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या ८१व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना सोमवारी मध्यरात्री मुंबईतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र अखेरी त्यांची प्राणज्योत मावळली. कोर्ट’ या चित्रपटाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे तब्बल १८ पुरस्कार पटकावले आहेत. ‘कोर्ट’ चित्रपटामध्ये वीरा साथीदार यांनी लोकशाहीर नारायण कांबळे ही मुख्य भूमिका बजावली होती. व ती अत्यंत गाजली होती.