नवी दिल्ली:- काही लोकसभा प्रतिनिधींनी केलेल्या ट्विटमुळे सुमित्रा महाजन यांच्या प्रकृतीबाबत काही उलट सुलट चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं.दिल्ली महिला कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटबाबत या संदर्भातील ट्विट सर्वात आधी करण्यात आलं होतं.यानंतर शशी थरूर,शरद पवार आणि खा.सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट केल्याने या अफवांना दुजारा मिळाला.यानंतर ही अफवा वाऱ्यांच्या वेगाने सोशल मीडियावर पसरली.
दरम्यान या बातमीवर भाजपाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.भाजपचे खासदार शंकर लालवानी यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आहे.
याचसोबत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी या संदर्भातील ट्विट करत, ‘ताई एकदम स्वस्थ है,भगवान उन्हे लंबी उमर दे!’ असा निर्वाळा दिला आहे.त्यामुळे ही एक अफवा होती हे स्पष्ट झाले आहे.