कोरोनामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं होत. या महामारीमुळे संपूर्ण देशात भारताच्या रस्त्यावर जे चित्र दिसले ते पाहून प्रत्येक संवेदनशील मन हळहळले. आता या मुद्यावर एक सिनेमा येतोय.
चित्रपटाचे नाव एका मजूराच्या कहाणीवर आधारित आहे.
२४ मार्च २०२० रोजी कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि यानंतर भारताच्या रस्त्यावर जे चित्र दिसले ते पाहून प्रत्येक संवेदनशील मन हळहळले.
स्थलांतरित मजुरांचे जत्थेच्या जत्थेचा पायी आपआपल्या घराकडे निघाले. बायको-मुलांसह उपाशापोटी निघालेल्या या लोकांपैकी अनेकांचा वाटेतच मृत्यू झाला. आता या मुद्यावर एक सिनेमा येतोय. होय, ‘1232KM’ या सिनेमाचे नाव. या सिनेमात स्थलांतरित मजुरांची व्यथा दाखवण्यात आली आहे. पत्रकार व दिग्दर्शक विनोद कापडी यांनी बनवलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.