मुंबई । पेट्रोल आणि डिझेल च्या दरवाढीमुळे सर्व सामान्यांमध्ये सरकार विरोध रोष निर्माण झाला असून विरोधी पक्ष सरकारवर ताशेरे ओढत आहे. प्रतिलिटर शंभर रुपयेच्या दराने पेट्रोल डिझेल महागले असून सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. याच पार्श्वभूमीवर एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
पेट्रोल दरवाढीवर आधारित हा मजेशीर व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. सदर व्हिडीओ हा प्रसिध्द कॉमेडियन श्याम रंगीला याने पोस्ट केला असून व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पेट्रोल पंप मालकाने कॉमेडियन श्याम च्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची समज दिली.
व्हायरल व्हिडिओतील तरुण हा नेहमीसारखा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जातो. पेट्रोल भरायला जाताना त्याच्या अंगावर पूर्ण कपडे असतात परंतु पेट्रोल भरून झाल्यावर त्याच्या अंगावरचे कपडे गायब होतात व त्याच्या तोंडून निघणार आवाज ही गायब होतो. या मजेशीर व्हिडीओला लूट लिया रे असं कॅप्शन देत हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
याचप्रमाणे अजून एक मजेशीर व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष्य वेधून घेतले या व्हिडिओ मध्ये एक तरुण बजाज फिनसर्च कार्ड देऊन हप्त्याने पेट्रोल मिळेल का अशी चौकशी करताना दिसत आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे.