जैतखेडा येथे सोमवार पासून भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात

कार्तिक राजगुरू


जैतखेडा (कार्तिक राजगुरू):- येथे श्रीराम मंदीर मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोध्या निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यात दैनंदिन कार्यक्रम काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,गाथाभजन,संगीत रामायण ,हरिपाठ,हरिकिर्तन, परिसरातील भजनी मंडळ यांचे हरिजागर राहणार आहेत.
ज्ञानेश्वरी पारायण ह.भ.प.कृष्णा महाराज गायकवाड (संभाजीनगर) यांचे राहणार आहे तर संगीत रामायण ह.भ.प.धनंजय महाराज म्हस्के व ह.भ.प.सखुताई महाराज म्हस्के यांचे असुन.यात
सोमवार दिनांक १५ रोजी ह.भ.प.शिवदत्त महाराज राजगुरू (विश्वमाई वारकरी शिक्षण संस्था बहीरगाव-कन्नड) यांचे किर्तन.
मंगळवार दिनांक १६रोजी ह.भ.प. संभाजी महाराज काकडे (परभणी).
बुधवार दिनांक १७ रोजी ह.भ.प.विजयदेवजी महाराज जाधव ( जोग महाराज संस्थान गुजरात).
गुरुवार दिनांक १८ रोजी ह.भ.प स्वामी रामेश्वरानंदजी महाराज (वैसपुर आश्रम).
शुक्रवार दिनांक १९ रोजी ह.भ.प.श्रीराम महाराज डोंगरे (आळंदी) शनिवार दिनांक २० रोजी ह.भ.प.माऊली महाराज जाहुरकर (बालकिर्तनकार) रविवार दिनांक २१ रोजी ह.भ.प.दिनानाथ सावंत महाराज(श्रीपुरवडे) यांचे होणार असून. सोमवार दिनांक २२रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत गावातुन ग्रंथदिंडी मिरवणूक काढण्यात येणार असून सकाळी ठिक १० ते १२ या वेळेत ह.भ.प.कृष्णा महाराज गायकवाड(संभाजीनगकर) यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठा अयोध्या सोहळ्यानिमित्त दि.२२ रोजी सायंकाळी दीपप्रज्वलन व महाआरती अभिषेक इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *