गुलाबाच्या फुलापासून अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत.गुलाबाच्या फुलापासून तयार केलेले गुलकंद शरीरासाठी फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे गुलाबाच्या फुलापासून तयार केलेले गुलाब पाणी शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. एलर्जीमुळे डोळे जळजळणे किंवा डोळे येण्याची समस्या असल्याने गुलाब पाण्याचे दोन थेंब डोळ्याला लावल्याने डोळ्यांना आराम पडतो.
तसेच त्वचेच्या संरक्षणासाठी गुलाब पाणी चमत्कारिक फायदे देते. चेहऱ्यावरील सौंदर्यात भर घालण्यासाठी अनेक अभिनेत्री आपल्या स्किन केयर रुटीन मध्ये गुलाब पाण्याचा वापर अवश्य करतात.गुलाब पाणी चेहऱ्यासाठी नैसर्गिक क्लिंजर म्हणून काम करते. बहुगुणी गुलाब पाणी रुक्ष त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते त्याचप्रमाणे मेकअप रिमूव्हल आणि नैसर्गिक टोनर म्हणूनही गुलाब पाण्याचा वापर फायदेशीर आहे. तसेच केसांच्या मुळांच्या भक्कम वाढीसाठी देखील गुलाब पाणी वापरता येते.
असे बहुगुणी गुलाब पाणी बाजारात सहज उपलब्ध असते. परंतु बाजारात उपलब्ध होणाऱ्या गुलाब पाण्यात भेसळ असण्याची शक्यता असते,त्यामुळे घरच्या घरी गुलाब पाणी बनवणे फायदेशीर ठरते. याच गुलाबपाण्याला घरगुती पद्धतीने बनवण्यासाठी पुढील प्रक्रिया नक्की वाचा-
गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात उकळून घेऊन हे मिश्रण थंड होऊ द्यावं. थंड झाल्यावर हे पाणी एका बॉटलमध्ये भरून रोज वापरले जाऊ शकते. घरच्या घरी नैसर्गिक टोनर बनवायचा असल्यास गुलाब पाण्यात ८ ते १० थेंब लव्हेंडर तेल आणि ग्लिसरीन घालून मिश्रण एकत्रित करावे. यामुळे सगळे घटक व्यवस्थित मिक्स होतील. जर, आपल्याला मेकअप रिमूव्हर म्हणून गुलाबाचे पाणी वापरायचे असेल, तर दोन चमचे गुलाबपाण्यात एक चमचा नारळाचे तेल टाकल्याने मेकअप काढण्यास मदत होते.