‘लागीर झालं जी’ फेमस अभिनेत्री शीतली म्हणजेच शिवानी बावकरला कोरोनाची लागण झाली आहे. तिने काही वेळापूर्वीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करून आपण कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले आहे.
‘सर्व काळजी आणि खबरदारी घेऊनही दुर्दैवाने माझी covid 19 चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सर्व प्रोटोकॉलचे पालन करत मी माझा डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे औषधोपचार करत आहे. मी सर्वांना विनंती करत की अतिरिक्त काळजी घ्या आणि आवश्यक असल्यासचं घराबाहेर पडा. सुरक्षित राहा आणि निरोगी राहा भेटू लवकरचं’. अशी पोस्ट आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे.