आपल्या सौंदर्याने भुरळ पाडणारी स्पृहा जोशी
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री, निवेदिका, संवेदनशील कवयित्री म्हणजे स्पृहा जोशी.
आपल्या मधुर आवाजाने चाहत्यांना भुरळ पाडणारी स्पृहा जोशी.
जांभळ्या रंगातील साडी न नाकात नाजूक मोत्याची नथ घालून खुलून दिसणारी स्पृहा जोशी.
सूर नवा ध्यास नवा’ – आशा उद्याची” या नव्या कोऱ्या पर्वात महाराष्ट्राच्या नव्या महागायिकेचा शोध घेतला जाणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी करत आहे. ‘महाराष्ट्र दिन विशेष..’ या भागासाठी स्पृहाने मराठमोळा लूक केला आहे.
स्पृहाने परिधान केलेल्या जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. नऊवारी साडी, नथ, त्यावर पारंपरिक दागिने असा स्पृहाचा मराठमोळा साज प्रेमात पाडणारा आहे.