मराठमोळे बाॅडीबिल्डर व आपलं नाव सर्वांच्या मनात कोरनारे जगदीश लाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्यांनी बडोद्यात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या कमी वयात त्यांनी बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्यांनी नवी मुंबई महापौर श्री चा किताब जिंकला होता. चार वेळा महाराष्ट्र श्री सुवर्णपदक, तसेच मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक जिंकले होते. तसेच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी कांस्य पदक मिळवले होते.
नवी मुंबईत राहणारे जगदीश लाड यांनी गेल्या वर्षी बडोद्यात व्यायामशाळा सुरु केली होती. त्यानिमित्ताने ते बडोद्यात होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मावळली.मात्र त्यांच्या जाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.