देशातील सर्वांत मोठ्या रिफायनरींपैकी इंडोनेशियातील बालोंगान रिफायनरीला भीषण आग लागली आहे. आतापर्यंत त्या भागातील 950 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.अग्निशामक दलाचे लोक ही आग विझवायचा प्रयत्न करत आहेत.मात्र आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. बालोंगान नावाच्या रिफायनरीला स्थानिक वेळेनुसार रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी आग लागली. या आगीत कमीत कमी ५ लोक जखमी झाले आहेत तर ९५० रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. काही लोक या आगीनंतर बेपत्ता झाले आहेत. आगीचे झोत मोठे असल्यामुळे आगीच्या ज्वाळा अजूनही धुमसत आहेत. धुराचे लोट आकाशभर पसरले आहेत. इंडोनेशियाच्या जावा भागात ही आग लागलेली आहे.
जखमींमध्ये जवळपास राहाणारी लोक आणि त्यावेळी रिफायनरी जवळच्या रस्त्यावर असणाऱ्या लोकांचा समावेश आहे.
आसपासच्या खेड्यात राहाणाऱ्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. मदतकार्य सुरू आहे पण कोव्हिड-19 च्या निर्बंधांमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.