सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे रविवारी सकाळी कुरुल रोडजवळील पत्र्याच्या दुकानांना भीषण आग लागली. हि आग पहाटे ३. ४५ वाजताच्या सुमारास लागलीआहे. कुरुल रोडच्या बाजूला जुबेर कुतुबुद्दीन शेख यांनी पत्र्याची ५ दुकान उभारली होती. त्या दुकानांना रविवारी पहाटे आग लागली. सर्वच गाढ झोपेत असताना अचानक त्यांना मोठा आवाज आला ते बाहेर येताच त्यांना समोरच्या दुकानांना आग लागलेली दिसली. त्यांनी जवळच्या नातलगांना फोन करून बोलून घेतलं मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केलं होते त्यामुळे आग विजवणे शक्य नव्हते.
आगीची माहिती मिळताच राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिक्यराणा पाटील यांनी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पाठवून दिली. दिवसेंदिवस आगीच्या घटनांचे सत्र हे वाढत जाताना दिसत आहे. सोलापूर जिह्यातील १५ दिवसांमधील दुसरी घटना आहे.