सोलापूर – राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जस-जशी रुग्णांची संख्या वाढतेय, तसा उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा तुडवडा देखील जाणवू लागला आहे. सोलापुरात खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रेमेडीसीवर इंजेक्शन मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
सोलापुरातील प्रसिद्ध हुमा मेडिकल बाहेर कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची भली मोठी रांग पाहायला मिळाली. रात्री ९ वाजल्यापासून अनेक रुग्णांचे नातेवाईक मेडिकल बाहेर रांगा लावून उभे आहेत. रात्री १२ वाजेपर्यंत स्टॉक न आल्याने डोळ्यात झोप घेऊन अनेक जण औषधासाठी प्रतीक्षा करत होते. जिल्ह्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय रुग्णालयात जरी पुरेशा प्रमाणात औषध साठा उपलब्ध असला तरी खासगी मेडिकलमध्ये मात्र अद्याप ही तुटवडा जाणवतोय.
रात्री १२ नंतर तरी इंजेक्शन मिळेल या अपेक्षेने डोळ्यात झोप, चिंता या सगळ्या भावना घेऊन नातेवाईक वाट बघत होते.