प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ चाहत्यांना भरभरून आवडतात तर काही व्हिडीओवर भरमसाठ टीका होतात ती व्हिडिओ ट्रोल होते. अशीच एक व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता, मात्र एका कमेंटमुळे ती व्हिडीओ आता वादाचा विषय बनला आहे.
होय २३ मार्चला २ मेडिकल विध्यार्थ्यांनी एक व्हिडीओ बनवला होता. व्हिडीओ लोकांच्या इतका पसंतीस उतरला की लोकांनी मोठ्या संख्येत तो शेअर केला आणि हजारो वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला. परंतु, मागील दोन दिवसात काही लोक याला वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हिडिओमध्ये पाहिल्या गेलेल्या मुलाचं नाव नवीन के रजाक असं आहे. याच कारणामुळे अनेकांनी या दोघांवर टीका केली आहे.
व्हिडीओबाबत अनेकांनी ट्विटर आणि फेसबुकवरही लिहिलं आहे. कृष्णा राज नावाच्या एका फेसबुक युजरनं लिहिलं, की जानकी आणि नवीन. त्रिसूर मेडीकल कॉलेजच्या या दोन्ही विद्यार्थ्यांचा डान्स व्हिडीओ भरपूर व्हायरल झाला आहे. यांचं पूर्ण नाव जानकी ओमकुमार आणि नवीन के रजाक असं आहे. यात काही शंका नक्कीच आहेत. जानकीच्या पालकांनी अधिक सावध राहाणं गरजेचं आहे. चला जानकीच्या नवऱ्यासाठी आणि नवीनच्या बायकोसाठी प्रार्थना करू.
या कमेंट नंतर लोकांमध्ये यावरुन वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.लोकांमध्ये यावरुन वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनतर अनेक लोक कृष्णा राजच्या बाजूने आहेत. तर काहीजण या विध्यार्थ्यांच्या बाजूने कमेंट करत आहेत.