बारामती : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्यात पुणे पाठोपाठ बारामतीमध्ये सुद्धा मिनी लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बारामती शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे बारामती शहरात देखील सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दुकाने तसेच व्यवहार सुरू राहतील. शहराबरोबरच तालुक्याला देखील हाच नियम लागू असल्याचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. रात्री सहा ते सकाळी ९ संचारबंदी करण्यात आली आहे.
कोरोनाची वाढती लोकसंख्या बारामतीकरांसाठी चिंतेची बाब ठरत आहे त्यामुळे बारामतीत देखील मिनी लॉकडाऊन चेनियम लागू करण्यात आले आहेत. शहरातील मॉल, हॉटेल, फूडकोर्ट, रेस्टॉरंट, बार, चित्रपटगृह, नाट्यगृह, स्विमींगपूल, स्पा, जिम हे पुढील सात दिवस बंद असतील. सर्व आठवडे बाजारही या काळात बंद असतील.
दरम्यान बारामती शहर व तालुक्यात सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत जमावबंदी तर संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ पर्यंत संचारबंदी असेल, असेही दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. दूध, भाजीपाला, फळे, वृत्तपत्र सेवेसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या पुरवठादारांसह हॉटेल पार्सल सेवेच्या व्यक्तींनाही यातून सूट देण्यात आली आहे. कोविड लसीकरणासाठी जाणा-यांनाही सूट दिली जाईल.