काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जनतेशी संवाद साधल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत बैठक होत आहे. या बैठकीत कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, मीनी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध या पर्यांयावर चर्चा होत आहे.
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर संवाद साधून कोरोना विषाणूचा फैलाव किती झपाट्याने होत आहे हे सांगितले. व लॉकडाऊनचा इशारा दिला असला तरी नागरिकांचं अर्थचक्र न थांबता काही उपाय योजना करता येतील का ? कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने निर्बंध लावण्यात यावेत, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. आणि या सर्वातून जो मार्ग निघेल त्याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.