संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात कोरोना रुग्णांसाठी प्रभावी ठरलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठया प्रमाणात महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्याकडून पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन वाटण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने हे वाटप करण्यात आले आहे. आज आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सोलापूरसाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचे वाटप पदाधिकाऱ्यांमार्फत सरकारी यंत्रणेकडे सुपूर्द केले आहे, अशी माहिती रोहित पवार यांनी ट्वीट करून दिली आहे.
आदरणीय शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी वेल्फेअर फंड यांच्यावतीने पहिल्यापासून प्रत्येक जिल्ह्याला औषधांची मदत करण्यात आली. याचप्रकारे गरीब व गरजू रुग्णांना मोफत देण्यासाठी शक्य तेवढे रेमडेसिवीर इंजेक्शन नगर,पुणे, सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणच्या सरकारी यंत्रणेकडं सुपूर्द केले. असे ट्विट त्यांनी केले आहे.
आज रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळबाजार करणाऱ्या कृत्रिम आणि टंचाई निर्माण करणाऱ्यावर सरकारकडून कारवाई केली जात आहे. सामान्य जनतेला रेमडीसीवीर इंजेक्शन सहजासहजी उपलब्ध होत नाहीये, अशा परिस्थितीत रोहित पवार यांनी रेमेडीसीवीर इंजेक्शनचे मोफत वाटप केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आदरणीय @PawarSpeaks साहेब आणि राष्ट्रवादी वेल्फेअर फंड यांच्यावतीने पहिल्यापासून प्रत्येक जिल्ह्याला औषधांची मदत करण्यात आली. याचप्रकारे गरीब व गरजू रुग्णांना मोफत देण्यासाठी शक्य तेवढे रेमडेसिवीर इंजेक्शन नगर,पुणे, सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणच्या सरकारी यंत्रणेकडं सुपूर्द केले. pic.twitter.com/3ACt1X2Lzs
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 11, 2021