अभिनेत्री स्मिता पाटील हीचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बर याने आपल्या हृदयावर आईचे नावाचा टॅटूने कोरलं आहे. प्रतीक बब्बरने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र तो बॉलिवूडमध्ये खास चमक दाखवू शकला नाही. मात्र तरिही त्याच्या लूक्समुळे त्याचे फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. प्रतीक कायम त्याची दिवंगत आई बाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतो.
नुकताच प्रतीकने त्याच्या आईच्या नावाचा टॅटू त्याच्या छातीवर काढला आहे. त्याचा हा टॅटू जबरदस्त असून नेटकऱ्यांना देखील तो फार आवडला आहे. ‘मी तिथेच तिच्या नावाचा टॅटू काढलाय जिथे ती आहे. माझ्या हृदयात. मला गेल्या अनेक वर्षांपासून हा टॅटू काढायचा होता. अखेर तो मी काढला. या टॅटूत १९५५ ते इन्फिनीटी (अनंत) असं लिहलेलं आहे. १९५५ साली ती जन्माला आली आणि आता ती अनंतापर्यंत माझ्यासोबत आहे, असे प्रतीकने एका मुलाखतीत सांगितले.