मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांच्यावर काल मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियानंतर शरद पवार यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटर अकाऊंटवरुन शरद पवार यांचे छायाचित्र शेअर केले आहे. यामध्ये शरद पवार वर्तमानपत्र वाचताना दिसत आहेत.
शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही.
मात्र, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा निर्णय अद्याप डॉक्टरांनी घेतलेला नाही अशी माहिती समोर आली होती. मात्र, आता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि चांगली आहे असे सुद्धा डॉक्टरांनी सांगितले आहे.
सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत. pic.twitter.com/ERf0Gl35Tp
— Supriya Sule (@supriya_sule) March 31, 2021