मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. तर दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. त्यात ऑक्सिजन अभावी अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे, याच पार्श्वभूमीवर रुग्णांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी मनपा प्रयत्न करत असल्याचे विधान महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. या संदर्भात पेडणेकर प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.
कोरोना संसर्ग आणि त्यामुळं वाढती रुग्णसंख्या पाहता मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. पण, या परिस्थितही आपण जितके बेड उपलब्ध करायचे आहेत त्या आवश्यकतेनुसार रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून ऑक्सिजनची सोयही उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
ऑक्सिजन अभावी रुग्ण दगवला तर त्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे ही बाब स्पष्ट करत, सध्याच्या परिस्थितीला ऑक्सिजनचा सिलिंडरचा पुरवठा होत नाही आहे, ज्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं पीडनकेअर यांनी बोलून दाखविले होते. रुग्णांना हँडी ऑक्सिजन देखील उपलब्ध करत आहोत असंही त्या म्हणाल्या.
मागच्या 3 दिवसांपासून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो. परंतु 10 टक्के लोक अजूनही बाहेर फिरत आहेत, ही वस्तुस्थिती त्यांनी सर्वांसमोर ठेवली. बाळासाहेब ठाकरे ट्रामा सेंटर मध्ये रुगांची संख्या वाढली तसं आम्ही लगेचच रुग्णांना दुसरीकडे हलवलं आहे असं म्हणत ऑक्सिजन पुरवठ्याच्या अनुषंगाने पालिका प्रशासन कंत्राटदारांच्या संपर्कात असल्याची महत्त्वपूर्ण माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.