भाजप नेते राम कदम हे पालघरमध्ये जायला निघाले असता त्यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. संपूर्ण देशाला कोरोनाने घेरले असतात कोरोनासारख्या विषाणूशी लढण्यासाठी संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण फिरण्यास बंदी केली आहे. मात्र राम कदम हे पालघरमध्ये जात असतात त्यांना पोलिसांनकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
गेल्या वर्षी पालघरमध्ये एका गावात जमावाने तीन साधूंची हत्या केली होती. त्या घटनेला आज १ वर्ष पूर्ण झाले आहे. पालघर जिल्ह्यातील गडचिंचोले या गावात गेल्यावर्षी १६ एप्रिल रोजी दोन हिंदू साधुची आणि त्यांच्या वाहनचालकाची ग्रामस्थानी हत्या केली होती. या हत्येप्रकरणी गावातील ११५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये ९ अल्पवयीन आरोपींचा देखील समावेश आहे. या घटनेनंतर पंतप्रधानांसह अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राम कदम पालघर जिल्ह्याचा दौरा करणार होते. कोरोना विषाणूची परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राम कदम यांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.