मुंबई- महाराष्ट्रात दिवसेंदिवस मृत्यूच्या आकडा वाढत आहे. मागील एक वर्षांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सामान्य नागरिकांला या कोरोना महारमारीमुळे आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोना रुग्ण वाढतायत मात्र अनेक गोष्टीचा तुटवडा निर्माण होत असल्याचे चित्र समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे.
माध्यमांशी बोलताना त्यांनी वाढणाऱ्या मृत्यू संख्येवरही त्यांनी चिंता व्यक्ती केली. “मुंबईकरांनी वेळ दवडू नये. प्रथम महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये यावं. नंतर हवं तर शिफ्ट व्हावं. विलंब करू नका. याचं विलंबामुळे मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. कुणावरही मृत्यू ओढवू नये म्हणून आम्ही काम करत आहोत,” असं पेडणेकर म्हणाल्या.
तसेच काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीबद्दलही त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. प्रत्येकाला आर्थिक विवंचना प्रत्येकाला आहे, पण जीव वाचणं महत्त्वाचं आहे,” असं महापौर म्हणाल्या. तसेच “रेल्वेचे दोन हजार ८०० बेड्स तयार आहेत. वरळीत एनआयसीएमध्ये बेड्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २०० बेड्स ऑक्सिजनचे असतील. त्यामुळे दोन ते अडीच हजार बेड्स त्वरित तयार होतील. कांजूरमार्गलाही पाहणी करतोय. दोन हजार बेड तयार केले जात आहे.
मुंबईकरांना आवाहन आहे की, तुमच्या वॉर्डमध्ये वॉररुममध्ये तुमची नोंदणी करा. जिथे बेड उपलब्ध असेल, तो बेड दिला आहे. यात चॉईस ठेवू नका. चॉईस ठेवल्यामुळे वेळ जातोय. तब्येत खालावल्यामुळे… कालच्या दिवसात ५० जणांचा मृत्यू झाला. मला वाटत ही धोक्याची मोठी सूचना आहे. ही त्सुनामी आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये सुरू झालेली लाट सप्टेंबरला गेली. पण, आता ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईकरांनी वेळ दवडू नये. प्रथम महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये यावं. नंतर हवं तर शिफ्ट व्हावं. विलंब करू नका. याचं विलंबामुळे मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. कुणावरही मृत्यू ओढवू नये म्हणून आम्ही काम करत आहोत,” असं पेडणेकर यांनी सांगितलं.