सोलापूर । सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी महापालिकेने जारी केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्याबाबत सोलापूर महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी गुरुवारी काढलेल्या आदेशाचा खुलासा केला आहे.
शनिवार-रविवारी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत असले तरी अत्यावश्यक सेवा आणि कारखाने तसेच विडी उद्योग सुरूच राहणार असल्याची माहिती आयुक्त श्री. शिवशंकर यांनी दिली आहे. सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या अफवांकडे लक्ष न देण्याचे व अश्या अफवांना बळी पडून घाबरून न जाण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
दरम्यान कोरोना काळातील सर्व नियमांचं व सुचनाचं नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावं,अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली आहे.घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावं हे सांगायलाही ते विसरले नाहीत.