अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांना भरलेल्या वाहनाच्या मालकाचा मृतदेह आढल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. मनसुख हिरेन अस मृत व्यक्तीचं नाव असून राज्यात वातावरण चांगलचं ढवळलं आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला.
त्याचप्रमाणे मनसुख हिरेन हे तीन दिवस सचिन वाझेंसोबतच चौकशीसाठी होते. अन्य कोणीही त्यांची चौकशी केली नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.