तेलगू सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री तसेच अनेक चाहत्यांची क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदानाला बॉलीवूडमधील तिसरा सिनेमा मिळाला आहे.एका लाईव्ह सेशनदरम्यान रश्मिका मंदानानेच याबाबत माहिती दिली. रश्मिका या तिसऱ्या सिनेमाबाबतचा तपशील मात्र सांगितलेला नाही. रश्मिका मंदानाला आतापर्यंत हिंदीमध्ये डब केलेल्या मूळ तेलगू सिनेमातूनच बघितले गेले आहे. पण आता ती लवकरच हिंदी एन्टरटेन्मेंट फिल्ममध्येही दिसायला सुरुवात होणार आहे.
‘मिशन मजनू’तून तिचे पदार्पण होणार हे निश्चित झाले आहे आणि ‘गुडबाय’ हा दुसरा सिनेमा साईन केला आहे. ‘गुडबाय’मध्ये तर तिला चक्क अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करायचे आहे. काही काळापूर्वी रॅपर बादशाह, युवान शंकर आणि उचाना अमित यांच्या एका म्युझिक अल्बममधील तिच्या परफॉर्मन्सचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. आता तर तिला तिसरा सिनेमाही मिळाल्याचे समजते आहे. त्यामुळे आता ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे, त्यामुळे अनेक चाहते असल्याने सगळ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.