मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर आरोप लावले होते. या आरोपावरून विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली होती. तसेच त्यांच्यावर लागवण्यात आलेल्या आरोपांच्या कालावधीत ते संसर्गावर उपचार करत असल्याचा दाखला पवारांनी केला होता. मात्र आज पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी पवारांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. या आरोपानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
फडणवीसांच्या तोंडातूनच आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या फोन टॅप करण्यात यायचा हे उघड झालं असून आता फडणवीसांनी मान्य केले आहे. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली माहिती खोटी आहे. त्यात पेन ड्राइव्हमध्ये जर देशमुखविरोधात माहिती होती तर ती मीडियाला का देण्यात आली नाही असा प्रश्न मलिक यांनी फडणवीसांना विचारला आहे.