सध्या पश्चिम बंगालसह इतर पाच राज्यांमध्ये निवडणुक आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर बघायला मिळत आहे.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेसनी मोदींना चिमटा काढला आहे. निवडणुकीच्या काळातच बंगालमध्ये लसीकरण सुरू आहे. मात्र, लसीकरण प्रमाणपत्रामुळे वाद उभा राहिला होता. तृणमूलने लसीकरण प्रमाणावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप घेत केंद्राकडे टीका केली होती. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादींने मोदींना पुन्हा एकदा टोला लगावलाय.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढे निघून गेले आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर मोदींचेच फोटो आहेत. जिकडे पहावं तिकडे मोदींचेच फोटो दिसतात. खादीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी स्वतःचा फोटो छापला. आता लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींनी स्वतःचा फोटो लावला आहे. हे असंच चालत राहिलं, तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतः फोटो छापतील,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.