सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडे या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या 31 मार्चला मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे.यावेळी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली.
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील कलाकारांना पक्षाशी जोडण्याचे धोरण आखले आहे. त्याचाच एक भाग म्हणून वैशाली माडे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येणार आहे.
वैशाली माडे यांनी अनेक चित्रपटांत गाणी आणि मराठी मालिकांची टायटल साँग गायली आहेत. मराठी बिग बॉसमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यात त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची चर्चा रंगली आहे. गायिका वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहे. त्यांनी झी वरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे.