सोशल मीडिया म्हटलं की अनेक पोस्ट, कमेंट्स, व्हिडीओज, फोटोस शेअर होत असतात. मात्र त्यात अनेक पोस्टवरच्या कमेंट्स या वादग्रस्त किंवा संतापजनक असतात अश्याच एका पोस्टवर आलेल्या युजर्सच्या कमेंटला अभिनेत्री नेहा धुपियाने सडेतोड उत्तर दिल आहे. आई बनल्यानंतर नेहाने एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ती मुलीला स्तनपान करताना दिसली होती. तिच्या या फोटोवर एका युजरने अशी काही कमेंट केली की, नेहाला राहावले नाही. तिने या ट्रोलरची चांगलीच शाळा घेतली. ‘तू तुझा ब्रेस्टफीड करतानाचा व्हिडिओ पोस्ट करू शकतेस का? नम्र विनंती!!!’, असे या युजरने लिहिले. ही कमेंट वाचून नेहा भडकली.
‘मी नेहमी अशा अनेक कमेंटना टाळते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. पण हे जगासमोर आणणे आवश्यक होते. कारण यांच्यासारख्या व्यक्तींमुळे संपूर्ण स्त्रीजातीसाठी आपल्याच मुलांना अंगावरचे दूध पाजणे ही लाजिरवाणी गोष्ट बनते,’ असे नेहाने म्हटले आहे.
तसेच तिने पोस्ट शेअर करत कॅप्शन देत ‘आई होणे काय आहे, हे फक्त तिलाच समजू शकते. मातृत्वासारखा दुसरा आनंद नाही. पण अनेकदा आपण सगळेच एक आनंदी असलेली बाजू पाहतो. पण दुसरीकडे ती थकलेली असते. तिच्यावर अचानक खूप जास्त जबाबदारी येऊन पडलेली असते. आपल्या मुलाला कुठे आणि कसे स्तनपान करावे, ही आईची मर्जी असायला हवी. पण अनेकदा स्तनपानाकडे सेक्शुअल पद्धतीने पाहिले जाते. अशा असंवेदनशील कमेंट्समुळे, विचारांमुळेच आपल्या देशातील महिला मुलांना स्तनपान करताना अन्कम्फर्टेबल असतात. आपल्याला ब्रेस्टफीडला सेक्शुअलाइज करायला नको, असे तिने म्हटले आहे.