मुंबई । अभिनेत्री काजोलने नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटी आपलया कोणत्या ना कोणत्या कारणांमूळे चर्चेत असतात. काही आपल्या लूकमुळे ट्रोल होतात तर काही सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे ट्रोल होत असतात. मात्र काजोलचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
या व्हिडीओमध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच ती व्हिडीओमध्ये हवेत सफरचंद कापताना दिसत आहे.
काजोलचा हा व्हिडीओ पाहून एका यूजरने ‘अन्न वाया घालवू नका. अनेक लोकं उपाशी मरतायेत. अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करु नका’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘लोकं उपाशी मरतायेत आणि तुम्हाला विनोद सुचतायेत. मॅडम अन्न वाया घालवू नका’ असे म्हटले आहे. त्यामुळे तिच्या या व्हिडीओमुळे आता ती चांगलीच ट्रोल होतेय.