सिंधुदुर्ग: नितेश राणे सुपारीबाज आमदार असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला आहे .नितेश राणे यांनी सातपुते याला सुपारी देऊनच शिवसैनिक संतोष परब यांच्यावर खुनी हल्ला घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे त्यांना पोलीस कस्टडीत जावे लागले आहे.
कणकवलीत भरदिवसा 18 डिसेंबर रोजी खुनी हल्ला झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी पुणे येथील आमदार नितेश राणे यांचा निकटवर्ती असलेल्या सचिन सातपुते याच्यासह पाच आरोपींना अटक केली होती .सचिन सातपुते याच्यासोबत आमदार नितेश राणे हे आपल्या खाजगी सचिवाच्या माध्यमातून संपर्कात होते ही बाब स्पष्ट झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्याच्या हालचाली कणकवली पोलिसांनी सुरू केल्या होत्या.
नितेश राणे यांनी प्रथम जिल्हा न्यायालय, यानंतर मुंबई उच्च न्यायालय, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय मध्ये धाव घेत अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र या तीनही ठिकाणी अपयश आल्यानंतर त्यांनी बुधवारी कणकवली न्यायालयात शरण येण्याचा निर्णय घेतला. कणकवली न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, ते सध्या कणकवली पोलिसांच्या ताब्यात आहेत.
नितेश राणे यांच्या “समय बलवान है” या बुधवारच्या ट्वीटचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. नितेश राणे यांचे बरोबर आहे. ‘समय बलवान होता म्हणून योग्य वेळी योग्य वेळेने साथ दिली’, म्हणून तुम्हाला पोलीस कोठडीत जावं लागलं. यामुळे समय बलवान आहे हे त्यांचे वाक्य तंतोतंत बरोबर आहे.