मुंबई दि.१७ – मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सध्या एनआयएच्या अटकेत असलेले सचिन वाझे यांच्या स्फोटक प्रकरणामुळे महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडामोड घडली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची बदली होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. त्यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाचं जबाबदारी पद देण्यात आले आहे.
या घडामोडीमुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाले आहे.विरोधक आणि सत्ताधारी सध्या एकमेकांवर निशाणा साधत आहेत.यावर प्रतिक्रिया देत शिवसेना खासदार यांनी आपल्या ट्विटर वरून एक पोस्ट शेअर केली आहे.
यात त्यांनी, ‘मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एखाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये.खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा’, असे मत व्यक्त केले आहे.