राज्यात रेमडेसिविर औषधाच्या वादावरून शीतयुद्ध पेटलेले दुसरीकडे आता याच मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य करत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविर औषधाच्या वादावरून सुरु असलेल्या टीव्हीवरच्या बातम्या बघून आता मलाही कंटाळ आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशा परिस्थितीत महाराष्ट्राला मदत करणे अपेक्षित होते असा टोला पाटील यांनी लगावला आहे.
तसेच यावेळी गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वर्तनाविषयी नाराजी व्यक्त केली. जनतेचा जीव वाचवण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन गरजेचे असताना विरोधी पक्षनेत्यांनी त्यासाठी पोलीस ठाण्यात जाणे, ही शरमेची बाब असे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. ते जळगावात पत्रकार माध्यमांशी बोलत होते.
रेमेडीसेवव्हीर राज्यातील जनतेला कसे मिळेल यासाठी पंतप्रधानांकडे प्रयत्न केले असते तर त्यांचीही वाहवा झाली असती. तेही राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत केंद्रातही त्यांचे सरकार आहे. रेमेडीसेवव्हीर हा राज्याला भेडसावणारा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्यात राजकारण न करता ज्या प्रमाणे त्यांनी लॉकडाऊन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला होता, त्याचप्रमाणे रेमडेसिविर मिळवून देण्यासाठी फडणवीसांनी मदत करायला पाहिजे होती, ही जनतेची अपेक्षा होती असे विधान त्यांनी केले आहे