संपूर्ण जग आता कोरोना विषाणूने त्रासले आहे. ज्या चीनच्या वुहान शहरातून हा विषाणू सर्वप्रथम आढळून आला त्याच विषाणूने संपूर्ण जगाला सळो कि पळो करून सोडला आहे. मात्र आता एक भयानक खुलासा चीन देशात झाला आहे. आता पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. ज्या चीनमधून या महामारीला सुरूवात झाली होती त्या चीनमधील तरूण आता इतके घाबरले आहेत की, ते मृत्यूच्या भीतीने आताच त्यांचं मृत्यूपत्र तयार करत आहेत.
खरतर चीनमध्ये १८ वर्षावरील व्यक्ती मृत्यूपत्र तयार करु शकतो .व १६वर्षांनंतर कुणीही स्वतंत्रपणे कमाई करू शकतात. मात्र इथे कोरोनाच्या भीतीने मोठया प्रमाणात मृत्यू पत्र तयार केली जात आहेत. एका रिपोर्टचा हवाला देत साउथ चायना मॉर्निंग पोस्टने सांगितले की जास्तीत जास्त चीनी नागरिक आधीपेक्षा जास्त इच्छाशक्तीसोबत आपलं मृत्यूपत्र तयार करत आहेत.
रिपोर्टनुसार, २०१९ ते २०२० पर्यंत १९९० नंतर जन्माला आलेल्या अशा तरूणांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत ६० टक्के वाढ झाली आहे. जे तरूण आपलं मृत्यूपत्र तयार करत आहेत. गेल्या ऑगस्टपासून आतापर्यत मृत्यूपत्र तयार करण्यासाठी संबंधित केंद्रावर येणाऱ्या कॉलची संख्या तिप्पट वाढली आहे. चीनी लोक आपलं घर आणि संपत्तीच्या व्यवस्थेसाठी सल्ले घेत आहेत.