नवी दिल्ली। थंडगार वातानुकूलित रेल्वेतून प्रवास करण हे सर्वांनाच परवडत नाही, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना खर्च परवडत नसल्याने वातानुकूलित रेल्वे प्रवास करणे हे स्वप्नच राहून जात. मात्र आता एसी प्रवास सर्वसामान्यांच्याही आवाक्यात येणार आहे.
रेल्वेच्या कपुरथला येथील रेल्वे कोच फॅक्ट्रीमध्ये एसी थ्री टियर इकॉनॉमी क्लासचा नवा कोच विकसित करण्यात आहे. एसी थ्री टियर इकॉनॉमी क्लासच्या या कोचमुळे एसी थ्री टियर आणि स्लिपर कोचच्या मधील पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये स्वस्त दरामध्ये प्रवाशांना आरामदायी आणि एसी ३ टियर कोचचा प्रवास करता येणार आहे. या कोचमध्ये ८३ बर्थ असणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या कोचचे यशस्वी परीक्षण कोटा आणि नागदाच्या दरम्यान करण्यात आले आहे. हा कोच रेल्वेच्या रुळांवरून १८० किमी प्रतितास वेगाने चालवण्यात आला. या कोचमध्ये बसण्यासाठी ८३ जागा असतील. दिव्यांगांसाठी दिव्यांग फ्रेंडली प्रवेश आणि एक्झिट गेट असतील या कोचमधील टॉयलेटसुद्धा दिव्यांग फ्रेंडली असेल.