शिक्षक सेनेच्या वतीने ‘उपक्रमशील शिक्षक पुरस्कार सोहळा’ मोठ्या उत्साहात संपन्न

पुणे : महाराष्ट्र शिक्षक सेनेच्या वतीने उपक्रमशील शिक्षक पुरस्कार ५सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर झाले होते त्या पुरस्काराचे आज रविवार दि.२४/०९/२०२३ रोजी पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांत अध्यक्ष तथा अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष तथा अनुसूचित जाती जमाती मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माननीय ज. मो. अभ्यंकर साहेब यांच्या शुभ हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी बालभारतीचे संचालक श्री.कृष्णकुमार पाटील सर राज्य सरचिटणीस रमेश चौगुले सर, पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल भाऊ जगताप, शिवसेना पुणे मनपाचे गटनेते श्री पृथ्वीराज दादा सुतार, पुणे जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष तथा शिक्षक सेना प. महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री हरिश्चंद्र गायकवाड सर,भालचंद्र मोरे सर, अप्पासाहेब पाटील सर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष मसरे सर, पुणे जिल्हा माध्यामिकचे अध्यक्ष रविंद्र वाघ, प्राथमिकचे अध्यक्ष एकनाथ आंबले, महिला आघाडी अध्यक्षा स्वाती वाळके व मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी अभ्यंकर साहेब म्हणाले राज्याचा शिक्षण विभाग देशात सातव्या क्रमांकावर गेला आहे. चुकीच्या कार्य पद्धती विरोधात शिक्षकांनी आवाज उठवणे गरजेचे आहे यावेळी खालील शिक्षकांना पुरस्कार वितरण करण्यात आले.
१) शितल रामचंद्र परब ( पिंपरी चिंचवड)२) मुरलीधर बळवंत मांजरे ( चाकण)३) वसंत ज्ञानदेव मोरे (भोसरी)४) रणजित सुदामराव बोत्रे (पुणे शहर )५) जयश्री बबन सरके ( भिगवण, इंदापूर)६) प्रीती प्रवीणकुमार दबडे ( आकुर्डी)७) शालिनी एकनाथ सहारे ( दापोडी, पुणे)८) भागूजी विठ्ठल शिखरे ( पुणे शहर)९) निलेश शंकर काळे (धायरी,पुणे)१०) सोमनाथ भानुदास चौधर (निमसाखर, इंदापूर) ११) हिरालाल माणिकराव धुमाळ ( मुंढवा) १२) विद्याराणी शंकर वाल्हेकर ( काळेवाडी) १३) तुकाराम जगन्नाथ डोंगरे ( कोलवडी, हवेली) १४) निता प्रकाश गुंजिकर (पुणे शहर) १५) निलेखा विकास तोटे (पुणे शहर) या शिक्षकांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आले.
तसेच विशेष पुरस्कार पुढील शिक्षकांना देण्यात आले. श्रीमती पीयुशा राहुल पाटील, श्रीमती स्नेहल कुंजीर,श्रीमती रोहिणी लाड, श्रीमती प्रगती साळवेकर, श्री रजनीकांत मेंढे सर,श्री शिवाजी शिंदे सर , श्री अजय शिखरे सर, श्री आजीनाथ चव्हाण सर ,शहीद मेजर शशीधरन विजय नायर यांच्या मातोश्री श्रीमती लता विजय नायर यांचा वीर माता म्हणून सन्मान करण्यात आला.. तसेच त्यांच्या पत्नी तृप्ती शशीधरन नायर यांचा वीरपत्नी म्हणून सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव आमले यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्रीमती स्वाती वाळके यांनी केले .