सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाच्या सध्य स्थितीतवर भाष्य करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना स्वरा भास्कर अनेकदा दिसून आली आहे. आता पुन्हा एकदा स्वराने केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. स्वराने ट्विटमध्ये एक व्हिडीओ शेअर करत किशोर कुमार यांचे गाजलेले गाणे ”मेरे मेहबुब कयामात होगी” अशी कॅप्शन देत देशांतील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर भाष्य करत केंद्रावर टीका केली होती.
स्वराने व्हिडीओ शेअर करत म्हटले की, आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठ्या विश्वासाने आम्ही निवडून दिले आहे ते ही दोन वेळा. त्यांना भारताच्या जनतेकडून हा खास संदेश म्हणत तिने नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. मात्र स्वराचे मोदी विरोधातील हे ट्विट अनेक नेटकऱ्यांना खटकले असून स्वरा विरोधात ट्विट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काहींनी तिच्या ट्विटचे सर्मथन केले आहे.
इतकेच नाही तर एकाने म्हटलंय की, ज्या गायकाची गाणं स्वराने ट्विट केले आहे. त्यावेळच्या सरकारने याच गायकाच्या गाण्यांवरही बंदी आणली होती. तर एकाने म्हटलंय की, जर थोडी तर माणुसकी शिल्लक असेल तर, व्हॅक्सिन उपलब्ध करु दे, लोकांची सेवा केलीस तर आम्हीही तुझे म्हणणे ऐकू, उगाच आरडो-ओरड करुन काही होत नाही, घरा बाहेर पड आणि लोकांची मदत कर, लोकांची प्रार्थनाच शेवटी तुझ्या कामात येणार आहेत असे सुद्धा अनेक नेटकऱ्यांनी तिला सुनावले आहे.
हमारे माननीय प्रधानमंत्री @narendramodi जी, जिन्हें बड़े नाज़ों और विश्वासों से हमने, विशाल बहुमत के साथ विजयी बनाया था (2 बार), उनके नाम भारत की बर्बाद होती हुई जनता का संदेश! ???????????? pic.twitter.com/tDunGLpNXQ
— Swara Bhasker (@ReallySwara) April 28, 2021