मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला जाणार असल्याचे समोर येत आहे मात्र हि भेट कोणत्याही राजकीय विषयावरून नसून शरद पवार यांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी असल्याची माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अचानक पोटदुखी व पित्ताशयाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. व त्यानंतर पित्ताशयाशी संबंधित आजारवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ते लवकर बरे व्हावे यासाठी सर्वच प्रार्थना करत होते . तसेच अनेकांनी ट्विटद्वारे भावना व्यक्त केल्या होत्या . त्यांनी आज त्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस देखील घेतला आहे व त्यानंतर सध्या ते घरीच विश्रांती घेत आहेत.