औरंगाबाद दि.२ – गेल्या काही महिन्यांपासून देशात सातत्याने पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरचे दर वाढत चालले आहेत. सिलेंडरच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. महागडे गॅस सिलेंडर घेणे त्यांना परवडणारे नसल्याने ग्रामीण भागात मातीच्या चुली पेटू लागल्या आहेत.
गॅसचे दर वाढल्याने सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागात गॅस सिलेंडर वापरणाऱ्या महिलांची मोठी गैर सोय झाली आहे. गॅस सिलेंडरच्या वापराने बंद पडलेल्या चुली आता पुन्हा पेटायला सुरूवात झाली आहे.यामुळे काही घरात गॅस सिलेंडर व शेगडीची जागा आता स्वंयपाक घरातून अडगळीच्या जागेत बदलण्यात आली आहे.
लवकरात लवकर गॅस सिलेंडरची दर वाढ सरकारने कमी करावी अशी मागणी देखील अनेक शेतकरी कुंटुबाने उचलून धरली आहे.